धुळ्यातील एमआयडीसीत लाल मसाल्यात भेसळ ; दोघे एलसीबीच्या जाळ्यात


भुसावळ/धुळे (25 सप्टेंबर 2024) : धुळे गुन्हे शाखेने एमआयडीसीत लाल मसाल्यात हानीकारक रंग आणि केमिकल्सची भेसळ करणार्‍या इम्रान अहमद (रा.मुस्लीम नगर, धुळे) व मोहम्मद असीम (रा.धुळे) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी हानीकारक रंग आणि केमिकल्स मस्जिद बंदर येथून आणायचे आणि एमआयडीमधल्या भाड्याच्या गाळ्यात हे काम करीत असताना पोलिसांनी बुधवार, 25 रोजी छापेमारी केली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ़फूड एंड ड्रग कार्यालयातील अधिकार्‍यांना पाचारण केले असून मुद्देमाल केमिकल तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यानंतर अहवाल येताच कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. दरम्यान, 120 किलो लाल मसाल्यामध्ये आठ किलो भेसळयुक्त तेल आणि 40 किलो अत्यंत हानीकारक आणि टॉक्सिक रंग आणि बाकीचे केमिकल्स टाकण्यात येत होते व लाल मसाला 110 रुपये प्रती किलो विक्री केला जात असल्याची माहिती आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

 


कॉपी करू नका.