बीडमध्ये हवाला रॅकेटवर पोलिसांची धाड : 26 लाखांची रोकड जप्त


Police raid hawala racket in Beed: 26 lakh cash seized बीड (26 सप्टेंबर 2024) : बीड शहरात हवाला रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेने छापेमारी करीत 26 लाख रुपये जप्त करीत पाच संशयीतांना ताब्यात घेतले. दरम्यान, नोटांवर कोडवर्ड लिहून देशभरात हे पैसे पाठवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना हवाल्याबाबत माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्यासह शहर ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहा.निरीक्षक बाबाराठोड यांच्या पथकाने बीड शहरातीलडीपी रोडवरील सारडा सेंट्रल, कबाडगल्ली व जालना रोडवरील सहकारभवन परिसरात अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. एका ठिकाणाहून 18 लाख, दुसर्‍या ठिकाणाहून 3 लाख तरतिसर्‍या ठिकाणाहून 5 लाख अशीसुमारे 26 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दुचाकी, मोबाईल, नोटा मोजण्याच्या मशीन जप्त केल्या आहेत.


कॉपी करू नका.