काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले ; निसर्गालाही पुण्यात मोंदीची सभा मान्य नव्हती


Congress leader Mohan Joshi said ; Even nature did not accept Mondi’s meeting in Pune पुणे (26 सप्टेंबर 2024)  : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुण्यातील नियोजित दौरा रद्द करण्यात आला. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी ानंतर भाजपावर निशाणा साधताना निसर्गालाही मोदींची सभा मान्य नसल्याचे म्हटले आहे.

जोशी म्हणाले मोदींना यापुढेही विरोध
काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुणेकरांसाठी नव्हता. हा दौरा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन होता. म्हणून काँग्रेसकडून आम्ही आंदोलन करणार होतो, तशा आशयाच्या नोटीस आम्ही पोलिसांना आणि प्रशासनाला दिल्या आहेत. आमच एकत म्हणणे आहे. 2016 मध्ये पुण्यात मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन झाले होते. आता आठ वर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रत्येक स्टेशनच्या उद्घाटनाला येतात. आमचा विरोध त्यांना यापुढेही असणार आहे, असंही जोशी म्हणाले.

निसर्गालाही मान्य नव्हता दौरा
राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने टीका करतात. याबाबत भाजपाने त्यांच्या नेत्यांवर कारवाई केलेली नाही, असंही जोशी म्हणाले. आता निसर्गालाही हा भारतीय जनता पार्टीचा, नरेंद्र मोदींचा हा राजकीय दौरा पसंत नव्हता म्हणून निसर्गाने पुणकरांना आणि विरोधकांना साथ दिली, असा टोलाही मोहन जोशी यांनी लगावला. गेल्या चार दिवसापासून प्रशासकीय यंत्रणा हे कामात होते. एसपी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार होती, सरकारच्या खर्चाने आज भारतीय जनता पार्टी विधानसभेची सभेच्या निवडणुकीचा शुभारंभ करणार होती, असा आरोपही जोशी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द
विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौर्‍यावर गुरुवारी येणार्‍या मोदींनी आपला दौरा रद्द केला. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर दौरा रद्द करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. तसंच ते भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते मात्र पावसामुळे मोदी यांचा आजचा रद्द करण्यात आला.


कॉपी करू नका.