आमदार शिरीषदादांच्या पाठपुराव्याला यश : रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये तीन कोटीतून होणार विविध कामे


रावेर (26 सप्टेंबर 2024) : महाराष्ट्र राज्य आपत्ती सौम्यीकरणांतर्गत राज्यातील जिल्हा आंपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांमार्फत विविध कामांचे प्रस्ताव शासनाकडे आमदार शिरीष चौधरी यांनी सादर केले. या कामापैकी रावेर मतदारसंघातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या सहा वेगवेगळ्या कामांना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या कामांना मिळाली मंजुरी
केर्‍हाळे ते जुने केर्‍हाळे रस्त्यावर संरक्षण भिंत बांधकाम करणे 90 लाख रुपये, कुसुंबा येथील दोन्ही गावांना जोडणार्‍या नाल्यावर पूल व संरक्षण भिंत बांधकाम करणे 50 लाख रुपये, सावखेडा येथील दोन्ही गावांना जोडणार्‍या नाल्यावर पूल व संरक्षण भिंत बांधकाम करणे 50 लाख रुपये, पाल मोरव्हाल जिन्सी रसलपूर-रावेर विटवा निंबोल रस्त्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे 50 लाख रुपये, पाल कुसुंबा-रावेर रस्त्यावर संरक्षक भिंतींचे बांधकाम करणे- 15 लाख रुपये, कळमोदा येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे 50 लाख रुपये असा एकूण तीन कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चौधरी यांनी यांचे आभार मानले आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !