माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन


Former minister Rohidas Patil passed away धुळे (27 सप्टेंबर 2024) : माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील (89) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार, 27 रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चाात दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.

काँग्रेस पक्षाची मोठी हानी
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. रोहिदास पाटील यांनी विविध खात्यांच्या मंत्रीपदी काम केले होते. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांचा मोठा पुढाकार होता. साधारण सहा महिन्यांपूर्वी माजी मंत्री रोहिदास पाटील कोल्हापुरात आपल्या मुलीकडे गेले असताना त्याची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. फुप्फुस कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर अलीकडे पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार
रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता धुळ्यातील देवपूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल आणि एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी, सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अंत्यविधीला काँग्रेसचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 


कॉपी करू नका.