लाडकी बहिण योजनेचा लाभ न मिळालेल्या 60 लाख बहिणींना लवकरच लाभ : देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
एकाही बहिणीला दिवाळीत ओवाळणीपासून वंचित ठेवणार नसल्याची स्पष्टोक्ती
शिर्डी (27 सप्टेंबर 2024) : दिवाळीत एकाही बहिणीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित महिला महामेळाव्यात दिली.
60 लाख बहिणींना लवकरच लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1 कोटी 90 लाख बहिणींच्या बँक खात्यात थेट लाभ देण्यात आला आहे मात्र 60 लाख महिलांना लाभ देणे बाकी असून त्यांना लवकरच लाभ दिला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे , सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरू राहणार
फडणवीस पुढे म्हणाले, रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्या लाडकी बहीणींना दिलेल्या महिलांसाठी योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल.




