आमदार एकनाथराव खडसे स्पष्टच बोलले : मंत्री महाजनांच्या सवयी सर्वांनाच ठावूक ; भोसरी भूखंडाविषयी दिलेली माहिती चुकीची


मुक्ताईनगर (29 सप्टेंबर 2024) : गिरीश महाजन यांनी एका माध्यमाशी बोलताना दिशाभूल करत माझ्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणतात भोसरी भूखंडात खडसेंनी भूखंड घेतला. आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता, मूळ मालकाचं नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री असताना तेवढी अक्कल मला होती. गिरीश महाजनांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची असल्याचे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीत मला पाडायचे असल्यास जामनेरला मुक्कामी रहा व मला पाडून दाखवा, असे आव्हान मंत्री महाजन यांनी दिल्यानंतर आमदार खडसे यांनी त्यांच्यावर शाब्दीक टिकेचे बाण चालवले आहेत.

महाजनांना भाव देण्याची गरज नाही
गिरीश महाजन हा माणूस नुसतं बडबड करणं आणि खोटं करण यात माहिर असून देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहुन मोठा झालेला गिरीश महाजन आहे स्वतःचं कर्तृत्व गिरीश महाजनांचे शून्य आहे त्यामुळे गिरीश महाजनांना भाव देण्यासारखं महत्त्व नाही, असे आमदार खडसे म्हणाले.


त्यांच्या सवयींविषयी न बोललेले बरे !
आमदार खडसे म्हणाले, मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही सवय नाही. मात्र त्यांना एक सवय आहे. त्यांची ती सवय सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरंएकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांच्या त्या सवयीवर चर्चा रंगली आहे.

आता म्हणता बोदवडमध्ये पाणी नाही. ती जबाबदारी तुमच्या आमदाराची आहे. काय करतोय तुमचा काय करतो आमदार? असा प्रश्न उपस्थित करीत आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी घेरले. तुमच्या आमदारानेच बोदवडमध्ये पाणी दिले नाही. ते म्हणतात, कोथळी ग्रामपंचायतीचा सरपंच तुमचा नाही. तर घ्या त्या सरपंचाची प्रतिक्रिया अन् विचारा कुणाचा सरपंच आहे ? असे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सुनावले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !