चिनावल ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानाचे राज्यातून प्रथम पारितोषिक

1 कोटी 75 लाखासह 50 लाखांचे अतिरिक्त बक्षीस जाहीर ः ग्रामस्थांमध्ये आनंद


Chinaval Gram Panchayat first prize from the state for the My Vasundhara Abhiyaan सावदा (29 सप्टेंबर 2024) : झी वसुंधरा 4 . 0 या अभियानांतर्गत चिनावल ग्रामपंचायतीला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी या पंचतत्वावर आधारित पर्यावरण पूरक ग्राम पातळीवर उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामपंचायतीचा माजी वसुंधरा 4.0 यात चिनावल ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला.

राज्यात चिनावल ग्रामपंचायत प्रथम
पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण विभाग पर्यावरण मंत्रालय जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली व यांनी दिलेल्या निकषावर आधारित पर्यावरण पूरक कार्य उत्कृष्टरित्या राबवणार्‍या राज्यभरातील ग्रामपंचायत पैकी चिनावल ग्रामपंचायतीला संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. ग्रामपंचायतीला 1 कोटी 75 लाख लाखांचे हे बक्षीस आहे.


अभियानात सातत्य ठेवत ध्यास घेऊन माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव, उपसरपंच शाहिन बी.शे.जाबीर, ग्रामविकास अधिकारी कैलास भगत व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामस्थांना सहभागी करून पर्यावरण पूरक व माझी वसुंधरा अभियानाला अनुसरून उत्कृष्ट असे कार्य केले. लवकरच हे पारितोषिक सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व सन्मान मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री, पर्यावरण मंत्रालय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

माझी वसुंधरा 4.0 या अभियानात चिनावल ग्रामपंचायतीने गेल्या 9 महिन्यात सोलर प्लॅन, कंपोस्ट खत, ग्राम स्वच्छता, वृक्ष लागवड, जल पुनर्भरण, कुटुंब कल्याण, पर्यावरण साक्षरता जनजागृती या पंचरात्वावर आधारित उपक्रम उत्कृष्ट व नियोजनबद्धरित्या राबवत यात सातत्य ठेवले व राज्यभरात या अभियानात जोरदार उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने संबंधित विभागाने यांची दखल घेत ग्रामीण माझी वसुंधरामये थेट राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक पटकावले. एक कोटी 75 लाखा सोबत 50 लाखांचे अतिरिक्त बक्षीस सुद्धा जाहीर झाले आहे.

यापूर्वी चिनावल ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा चे राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस मिळाले होते आता पुन्हा माझी वसुंधरा 4 .0 चे बक्षीस जाहीर झाल्याने गावात आनंद व्यक्त केला जात आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !