तर जामनेरात मुक्काम करून मला पराभूत करुन दाखवा : मंत्री गिरीश महाजनांचे आमदार खडसेंना आव्हान


So stay in Jamnerat and defeat me : Minister Girish Mahajan challenges MLA Khadse जामनेर (29 सप्टेंबर 2024) : जिल्ह्यात विकासाची कामे ‘मी’ केली असून जामनेर तालुक्यात धरणांची कामे ‘मी’ केली, रस्ते ‘मी’ केले असे, ‘मी’ केले म्हणणारे एकनाथराव खडसे यांच्यात ‘मी’ पणा ठासून ठासून भरला आहे. अशा ‘मी’ पणाचे एक वेळा गर्वहरण होते. मग तुमच्या बोदवड तालुक्याला महिनो न महिने पाणी का मिळत नाही ? अगोदर पाणीटंचाई सोडवा, मग विकासाच्या गोष्टी करा. स्वतःची ग्रामपंचायत सांभाळू न शकणारे खडसे जामनेरच्या विकासावर बोलतात ही मोठी शोकांतिका आहे. जर मला पराभूत करायचे असेल तर जामनेरातच मुक्काम ठोका आणि मला पराभूत करुन दाखवा, असे थेट आव्हान मंत्री गिरीष महाजन यांनी आमदार एकनाथराव खडसेंना दिले आहे.

आमदार खडसेंना आव्हान
पाचोरा रस्त्यालगतच्या बाबाजी राघो मंगल कार्यालयात पार पडलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांनी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंवर टीका करत खडसेंना थेट आव्हान दिले.


आमच्याकडे काय दाळ शिजवताय !
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, तुमच्या तालुक्यात तुमची दाळ शिजत नाही आणि आमच्याकडे येऊन काय दाळ शिजवताय? असाही प्रश्न उपस्थित करुन इकडचे पाणीच वेगळे आहे. उठले की तेच तेच बोलतात मग तुमची नार्को टेस्ट करा. सोबत माझीही करा. लगेच कळेल ‘दूध का दूध… पाणी का पाणी…’ असाही टोलाही मंत्री महाजन यांनी लगावला.

यांची होती उपस्थिती
ही बैठक भाजपा नेते खा. बंशीलालजी गुर्जर, आ.आशिषभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अ‍ॅड.शिवाजी सोनार, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, शेंदुर्णीचे संजय गरूड, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, आतिष झाल्टे, रवींद्र झाल्टे, नवलसिंग पाटील, विलास राजपूत, सुहास पाटील, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !