भरधाव बसच्या धडकेने जळगावात वयोवृद्धाचा मृत्यू
An elderly man died in Jalgaon after being hit by a speeding bus जळगाव (29 सप्टेंबर 2024) : कामावरुन घरी परत जाणार्या सदू ओंकार चव्हाण (65, मूळ रा.आंबेवडगाव, ता. पाचोरा, ह मु.नेहरुनगर) यांचा भरधाव बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉन समोर झाला.
जागीच झाला मृतयू
पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील सदू चव्हाण हे मेहरुण तलाव परिसरात एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. शनिवारी रात्री ते कामावरुन घरी जात असताना पाचोर्याकडे जाणार्या बसने (एम.एच.20 बी.एल.1197) ने त्यांना धडक दिली. यात सदू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

काही वेळाने चव्हाण यांचा मुलगा आला व ठार झालेले आपले वडील असल्याचे समजले. यावेळी वडीलांचा मृतदेह बघताच त्याने आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळाहून बससह चालकाला ताब्यात घेतले.




