शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या त्या नऊ मंत्र्यांसाठी पक्षाचे दरवाजे बंद : शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
नागपूर : शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पवार गटातून बाहेर पडलेल्या नेत्यांसाठी मोठे विधान केले आहे. शरद पवार यांना सोडून महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या त्या नऊ जणांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही, असे आमच्या पक्षाने ठरविल्याचे ते म्हणाले आहेत.
गृहमंत्री फोडाफोडीच्या राजकारणात माहीर
देशमुख म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळेच बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. आरोपी हा कुठलाही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा फोडाफोडीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.

अजित पवार स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतात
अजित पवार गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे भाजप अजित पवार यांना कधीही सांगू शकते त्यामुळे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात, अशी परिस्थिती असल्याचेही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.




