चारचाकी वाहनांच्या बॅटरी लांबवणारा अट्टल चोरटा धुळे तालुका पोलिसांच्या जाळ्यात


धुळे (05 ऑक्टोबर 2024) : चारचाकी वाहनांमधून महागड्या बॅटरी लांबवणार्‍या चोरट्याला धुळे तालुका पोलिसांनी अटक करीत त्याच्याकडून तब्बल 12 बॅटरी जप्त केल्या आहेत. शकील शेख सलीम शेख सेंंधवा (38, बाबा नगर, नटराज टॉकीजसमोर, 80 फूट रोड, धुळे) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
हजारो रुपयांच्या बॅटरी जप्त
12 ते 25 सप्टेंबरदरम्यान धुळे-चाळीसगाव रोडवरील विंचूर गावाजवळून काँक्रिट मिक्सरच्या 18 हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटरी चोरट्यांनी लांबवल्याने जितेंद्र प्रसाद यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे तालुका निरीक्षक अभिषेक पाटील यांना या गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले असता त्याने साथीदारांसह अन्य ठिकाणाहून अशाच पद्धत्तीने बॅटरी चोरीची कबुली देत तब्बल 12 बॅटरी काढून दिल्या. आरोपी बॅटरी चोरी करताना चारचाकी वाहनाचा वापर करीत असल्याने या वाहनाबाबतही माहिती घेतली जात आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक  साजन सोनवणे, धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर खैरनार, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार उमेश पवार, हवालदार ललित खळगे, हवालदार मनोज शिरसाठ, कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल धीरज सांगळे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !