अंबे माता दार उघड, गोरगरिबांना हिणवणार्‍यांचा सत्यानाश कर ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील


Destroy those who exploit the poor! : Guardian Minister Gulabrao Patil जळगाव (26 ऑक्टोबर 2024) : अंबे दार उघड आणि आमच्या विरोधात बोलणार्‍यांचा गोरगरिबांना हिणवणार्‍यांचा सत्यानाश कर, असे खळबळजनक विधान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जीवन छोटेसे आहे. गुलाबराव पाटील आज बोलतो उद्या चालला जाईल मात्र तुमचे काम करुन गेलो तर तुम्ही कायम लक्षात ठेवाल. आज जे काही बोलत आहे, ते सर्व बहिणींच्या आशीर्वादानेच बोलत असल्याचे गुलाबराव म्ळणाले.

तर लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत !
कुणी कितीही लालसा दिली, एक वेळ पुरुष बेईमान होतील, पण आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले. वधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात गुलाबराव पाटील यांची सभा पार पाडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले. जर पुन्हा आमचे सरकार आले, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.





चांगल्या कामाला वाईट म्हणण्याचा विरोधकांचा धंदा
मी लोकांना पंढरपूरला घेऊन गेलो. तुम्ही किमान वणी गडावर किंवा मनुदेवीला तरी न्या. नुसते भाषण करुन चालत नाही तर करुन दाखवावे लागते. स्वत:ला मुलगा झाला तर तो चांगला आणि दुसर्‍याला मुलगा झाला तर तो काळा नकट, अशी विचारसरणी विरोधकांची आहे. प्रत्येक गावात रावण अजून जिवंत आहे. चांगल्या कामाला वाईट म्हणणे हाच विरोधकांचा धंदा आहे, असे म्हणत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !