विसरवाडीनजीक भरधाव ट्रकने 58 मेंढ्यांना चिरडले

नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघात : ट्रक चालकाला अटक


58 sheep were crushed by a speeding truck near Visarwadi नवापूर (06 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भरधाव ट्रकने रस्त्यावरून जाणार्‍या मेंढ्यांना चिरडल्याने 58 मेंढ्यांचा मृत्यू झाला तर 48 मेंढ्या जखमी झाल्या. या घटनेत अनेक मेंढ्या गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. मेंढपाळांचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून विसरवाडी पोलिसांना ट्रक चालक रमेश दुगंला (राजू) यास अटक केली आहे. ही घटना रविवार, 6 रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.

भरधाव ट्रकने चिरडले
साक्री तालुक्यातील विजापूर येथील मेंढपाळ विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात सातशेवर मेंढ्या घेऊन जात होते. त्याचवेळी आंध्र प्रदेश राज्यातील ट्रकचालक मागून भरधाव वेगाने येत होता. काही कळायच्या आत त्याने मेंढ्यांना चिरडले. यात 58 मेंढ्या चिरडल्या गेल्या तर 48 जखमी झाल्या. यात काही गर्भवती मेंढ्या देखील होत्या.

मेंढपाळांचे साडेपाच लाख रुपयांचे यात नुकसान झाले आहे. मेंढपाळांनी रस्त्याच्या कडेला बसून आक्रोश केला. ट्रक चालकास विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर, ता.साक्री जि.धुळे) यांच्या मालकिच्या या मेंढ्या असल्याचे सांगण्यात आले.

मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.


कॉपी करू नका.