भोपाळच्या बंद कारखान्यातून 1800 कोटींचे ड्रग्ज जप्त
भोपाळसह नाशिकच्या आरोपीला बेड्या : दररोज बनवले जात होते 25 किलो एमडी
Drugs worth 1800 crore seized from a closed factory in Bhopal भोपाळ (06 ऑक्टोबर 2024) : भोपाळमधील एका बंद कारखान्यातून सुमारे एक हजार आठशे रुपये कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने एटीएसने शनिवारी ही कारवाई करीत दोघांना अटक केली. कटारा हिल्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बागरोडा गावातील औद्योगिक परिसरात हा कारखाना आहे. अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी (भोपाळ, मध्य प्रदेश) सन्याल बने (नाशिक) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहे. दरम्यान, गुजरातच्या सुरतमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संबंध आढळून आल्यानंतर भोपाळमध्ये ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बागरोडा गावातील औद्योगिक परिसरातील कारखान्यात मेफेड्रोन (एमडी) या औषधाची निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. सुमारे पाच हजार किलो कच्चा माल आणि तो बनवण्यासाठी वापरलेली उपकरणे जप्त करण्यात आली. त्यात ग्राइंडर, मोटर्स, ग्लास फ्लास्क, हीटर आणि इतर उपकरणे समाविष्ट आहेत. पुढील तपासासाठी हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कारखान्यात झडती घेतली असता एकूण 907.09 किलो मेफेड्रोन (घन आणि द्रव अशा दोन्ही स्वरूपात) आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत 1814.18 कोटी रुपये आहे. दिव्य मराठी पोर्टलने याबाबत ऑनलाईन वृत्त दिले आहे.