भुसावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून डॉ.राजेश मानवतकर प्रबळ दावेदार !

पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती : दहा इच्छूकांनी मागितली सुप्रीमोंकडे उमेदवारी


Dr. Rajesh Manavatkar is a strong contender from NCP for Bhusawal Legislative Assembly! भुसावळ (07 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विधानसभेचा आखाडा निवडणुकीपूर्वीच तापला असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून या जागेवर उमेदवारीसाठी दावा केला जात असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भुसावळातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राजेश मानवतकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात सोमवारी उमेदवार निवडीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पवारांनी डॉक्टरांकडून मतदारसंघाचा आढावा, जमेची बाजू, राजकीय परिस्थिती जाणून घेतली.

पुण्यात झाल्या इच्छूकांची मुलाखती
महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भुसावळ (अनुसूचित जाती राखीव) या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी पुण्यात निसर्ग मंगल कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. प्रसंगी दहा इच्छूक उमेदवारांनी शरदचंद्र पवार, माजी मंत्री फौजिया खान आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांसमोर मुलाखती दिल्यात.


या उमेदवारांनी दिल्या मुलाखती
या मुलाखतीमध्ये शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश मानवतकर, प्रीती तोरण महाजन, प्रा.डॉ.जतीन मेढे, दिनेश भोळे, प्रा.एम आर.संदानशीव, संगीता भामरे, जगन सोनवणे, नंदा सपकाळे आदींसह एकूण दहा उमेदवारांनी मुलाखती दिल्यात.

याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी यांच्यासोबत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष मालकर, अल्पसंख्यांक विभागाचे जळगावचे महानगरचे अध्यक्ष एजाज गफार मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !