जम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस इंडिया आघाडीवर तर हरियाणात मात्र भाजपा-काँग्रेसमध्ये टक्कर
नवी दिल्ली (08 ऑक्टोबर 2024) : हरियाणा व जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या व मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडत आहे. एक्झीट पोलने हरियाणात काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावा केला मात्र हा दावा फोल ठरू पाहत असून हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 39 तर भाजपा 47 जागांवर आघाडीवर आहे तर जम्मू काश्मिरमध्ये मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी 24 जागांवर आघाडीवर असून भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी तीन जागांवर तर अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, दुपारनंतर संपूर्ण निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मूत प्रथमच निवडणूक
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली असून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. निकालाआधी निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजुने कौल देण्यात आला होता तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र अंदाज फोल ठरू पाहत आहे.
स्थानिक पक्ष ठरणार किंग मेकर
जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. फारुख अब्दुल्लाह यांचा नॅशनल कॉन्फरन्स व महबुबा मुफ्तींची पीडीपी मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.
हरीयाणात एक्झीट पोलचा दावा फोल
हरीयाणात काँग्रेसला बहुमत मिळेल, असा दावा एक्झीट पोलने व्यक्त केला. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने येथे मुसंडी मारली आहे. सूत्रानुसार-
काँग्रेस- 39
भाजप- 47
आयएनएलडी- 2
जेजेपी- 0
इतर- 2