यावलच्या आश्रय फाऊंडेशनकडून महिलांसाठी श्री क्षेत्र मनुदेवीसाठी मोफत बससेवा

हजारो महिलांनी घेतला दर्शनाचा लाभ : डॉ.कुंदन फेगडे यांचे मानले आभार


यावल (08 ऑक्टोबर 2024) : शहरातील आश्रय फाऊंडेशनच्या वतीने या शारदीय नवरात्रोत्सवात आई मनुदेवी मंदिरात दर्शनाकरीता यावल एस.टी. आगारातून मोफत बससेवा देण्यात आली. रविवारी यावल व रावेर तालुक्यातील सुमारे एक हजार महिला व मुलींनी याचा लाभ घेत मनुदेवीचे दर्शन घेतले.

डॉ.कुुंदन फेगडे यांचा पुढाकार
आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या वतीने रावेर यावल तालुक्यातील महिलांना नवरात्री निमित्ताने मनुमातेच्या दर्शनाला जाता यावे यासाठी मोफत एस टी बस उपलब्ध करून देण्यात आली. रविवारी यावल आगारातून महिलांना याचा लाभ देण्यात आला. उपक्रमास माता-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रावेर, यावल तालुक्यातील महिलांना यावल बस स्थानकातून बसेस भरभरून मनुदेवी येथे आल्या. सर्व महिला भाविक अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आल्या. या सर्व महिलांचे स्वागत डॉ.जागृती कुंदन फेगडे यांनी केले.


यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
मंदिरात दर्शनासाठी श्री मनुदेवी संस्थानचे सचिव नीलकंठ चौधरी, विश्वस्त सोपान वाणी, सुनील महाजन, सतिष पाटील, शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, लिपिक महेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. यावल व रावेर तालुक्यातुन सुमारे एक हजारांपेक्षा जास्त महिलांनी बस प्रवासाचा लाभ घेतला. यशस्वीतेकरीता भूषण फेगडे, रितेश बारी, उज्वल कानडे, अक्षय पवार, कोमल इंगळे, सागर इंगळे, शुभम देशमुख, विनीत सोनवणे, सोनू नेमाडे, दीपक फेगडे यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !