भुसावळात तालुका क्रीडा संकुल टाकणार कात : सात कोटींच्या कामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

खेळाडूंना सरावासाठी मिळेल हक्काची जागा : जिल्हास्तरीय स्पर्धा होणार : आमदार संजय सावकारे


Taluka sports complex to be built in Bhusawal : Bhoomipujan of works worth seven crores by MLAs भुसावळ (08 ऑक्टोबर 2024) : जुगादेवी भागातील तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठी सात कोटी 29 लाख 45 हजार रुपयांच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. अल्पावधीत भुसावळ शहरासह तालुक्यातील खेळाडूंना मोठी पर्वणी मिळणार आहे. या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होतील सोबतच तालुक्यातील खेळाडूंना नियमीत सराव करता येईल, आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. तालुका क्रीडा संकूलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते नुकतेच झाले.

यांची होती उपस्थिती
भुसावळ तालुका क्रीडा संकूलाच्या वाढीव कामाच्या भूमिपूजनप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते गिरीष महाजन, उद्योजक मनोज बियाणी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, देवा वाणी, समाजसेवक अजय नागराणी, अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे, राजेंद्र नाटकर, राहुल तायडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


विविध खेळांसाठी स्वतंत्र मैदान
आमदार सावकारे म्हणाले की, वाढीव कामांमध्ये आपण प्रथम वॉलकंपाऊंड उभारणी केली. यामुळे जागेला सुरक्षिीतता मिळाली आहे. भुसावळ तालुका क्रीडा संकूलात जलतरण तलावासोबतच, बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, टेनीस, लाँग जंम्प, ट्रीपल जंम्प, रनींग ट्रॅक, जॉगींग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, नेट क्रिकेट आदी मैदानांचे स्वतंत्र मैदाने तयार होणार आहे. भुसावळ शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांच्या स्पर्धा, खेळाडूंचा सराव आदींसाठी सुविधा मिळणार आहेत. यामुळे विविध खेळाडू तयार होतील, असा विश्वास आमदार सावकारे यांनी व्यक्त केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !