मनुदेवीच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांवर काळाचा घाला ; निजामपूरच्या भावंडांसह तिघे ठार


Time wears on the devotees going to see Manudevi ; Three killed including siblings of Nizampur चोपडा (08 ऑक्टोबर 2024) : यावल-चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटून ती शिवशाही बसवर धडकून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूरच्या तिघा भाविकांचा मृतयू झाला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी चोपडा-धरणगाव रस्त्यावरील चोपडा सुत गिरणीजवळ घडला.

भावंडांसह तिघे ठार
नवरात्रोत्सवानिमित्त मनुदेवीच्या दर्शनासाठी साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब रीटस् कारद्वारे मंगळवारी सकाळी जात असताना वाहनाचे टायर फुटले व ती शिवशाही बसवर आदळली. या अपघातात शैलेश श्रीधर वाणी (34) व निलेश श्रीधर वाणी (30) या भावंडांसह जितेंद्र मुरलीधर भोकरे (47) यांचा मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कॉपी करू नका.