भुसावळचे चंद्रशेखर अग्रवाल यांची धुळे शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारीपदी निवड


भुसावळ (08 ऑक्टोबर 2024) : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे व उत्तर महाराष्ट्र प्रभारी योगेश मैंद यांनी राज्यभरात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रभारी नियुक्त केलेे आहेत. त्यात भुसावळचे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर (मोंटू) अग्रवाल यांची धुळे शहर व ग्रामीणच्या जिल्हा प्रभारीपदी निवड केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री व युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. चंद्रशेखर यांची निवडीबद्दल त्यांच्यावर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


कॉपी करू नका.