भाजपाची हरियाणात सलग तिसर्‍यांदा हॅट्रीक : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव


BJP’s third consecutive hat-trick in Haryana : Congress’s defeat in the assembly elections हरियाणा (09 ऑक्टोबर 2024) : एक्झीट पोटचा अंदाज खोटा ठरवत हरियाणामध्ये भाजपाने विधानसभा निवडणुकीत तब्बल 48 जागांवर विजय मिळवला असून सलग तिसर्‍यांदा येथे भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यातील एकूण 90 जागांपैकी पक्षाने 48 जागा जिंकल्या तर दोन जागांची अधिकृत घोषणा बाकी आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी आठ जागांची वाढ झाली.

काँग्रेसला 37 जागा
हरियाणात सत्ता बदल होईल, असा एक्झीट पोलचा अंदाज होता मात्र तो खोटा ठरला. काँग्रेसने येथे 37 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सहा जागांचाही फायदा झाला आहे. मुख्यमंत्री नायब सैनी लाडवा आणि काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा गढी-सांपला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. काँग्रेसने हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

सीएम सैनी म्हणाले की, जनतेने काँग्रेसचा खोटारडेपणा नाकारला आहे. भाजपच्या आघाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन केले.

दरम्यान, नवीन सरकारचा शपथविधी दसर्‍याला म्हणजेच 12 ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

असे आहे पक्षीय बलाबल
भाजपा- 48
काँग्रेस- 37
इनेलो- 02
अन्य- 03

https://x.com/narendramodi/status/1843638857029562747?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1843638857029562747%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=about%3Asrcdoc


कॉपी करू नका.