महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार ! : हरियाणा निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
The grand alliance government will come again in Maharashtra! : Chief Minister Eknath Shinde after Haryana result मुंबई (09 ऑक्टोबर 2024) : हरियाणात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार विजयी झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरियाणा निकालानंतर प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रातही पुन्हा महायुती सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जातीयवाद पराभूत झाला आणि विकासाचा विजय झाला. डबल इंजिनाची विजयी घोडदौड सुरूच असल्याचे शिंदे म्हणाले.
फेक नरेटीव्हला महत्व नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यातून त्यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. हरयाणाच्या जनतेने फेक नरेटिव्हला महत्त्व दिले नाही, असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातही पुन्हा महायुती सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.





