विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा विजय ; पंतप्रधान नरेंद्र मोदी


The triumph of politics of development and good governance ; Prime Minister Narendra Modi नवी दिल्ली (08 ऑक्टोबर 2024) : हरियाणामध्ये सलग तिसर्‍यांदा भाजपाने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत इतिहास रचला आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये या निकालाने उत्साहाचे वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल जनतेचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. एक्सवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात हा विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले मोदी ?
मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी येथील लोकांना ग्वाही देतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही. या महाविजयासाठी प्रचंड कष्ट आणि समर्पित वृत्तीने काम करणार्‍या माझ्या सर्व कार्यकर्त्या सहकार्‍यांचे खूप खूप अभिनंदन! तुम्ही फक्त राज्यातील जनता-जनार्दनाची भरपूर सेवाच केली नाही, तर विकासाचा आपला अजेंडा (कार्यक्रम) त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. याचाच परिणाम म्हणजे भाजपाचा हरयाणात हा ऐतिहासिक विजय झाला आहे.

सलग तिसर्‍यांदा हॅट्रीक : 48 जागांवर यश
2019 च्या तुलनेत यावेळी भाजपाची कामगिरी चांगली राहिली. हरियाणात भाजपाने 48 जागा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसची कामगिरी सुधारली असली, तरी सत्ता मिळवण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळवता आला. आयएनएलडी पक्षाला दोन, तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

 


कॉपी करू नका.