धुळे तालुका पोलिसांनी रोखली तस्करी : अहमदनगरच्या संशयीताकडून अडीच लाखांचा गांजा जप्त

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई


Dhule taluka police intercepted smuggling : Ganja worth 2.5 lakh seized from Ahmednagar suspect धुळे (09 ऑक्टोबर 2024) : धुळे तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीवरून चारचाकीतून होणारी गांजा तस्करी रोखत अहमदनगर येथील संशयीताला बेड्या ठोकल्या व त्याच्याकडील दोन लाख 42 हजारांचा गांजा जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी दुरक्षेत्र कार्यालयाजवळ ही कारवाई सोमवार, 7 रोजी करण्यात आली. अन्सार मुसा पठाण (41, रा.तुळजापूर देवी मंदिराजवळ, बुरहाननगर, अहमदनगर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मुंबई-आग्रा महामार्गावरून एका वाहनातून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले. संशयीत कार (एम.एच.04 जी.जे.3384) आल्यानंतर तिची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यात गांजा हा मादक पदार्थ आढळल्याने चालकास अटक करण्यात आली तर वाहन व गांजा जप्त करण्यात आला. 7 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आले. जप्त गांजाचे वजन 11 किलो असून त्याचे बाजारमूल्य दोन लाख 42 हजार तर तीन लाख रुपये किंमतीचे स्वीप्ट मिळून पाच लाख 42 हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात कार चालक अन्सार मुसा पठाण (रा.तुळजापूर देवी मंदिराजवळ, बुरहाननगर, अहमदनगर) याच्याविरोधात पोलीस कर्मचारी रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, कॉन्स्टेबल महेंद्र गिरासे, कॉन्स्टेबल राकेश मोरे, कॉन्स्टेबल राहुल देवरे, कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर, कॉन्स्टेबल योगेश पाटील, कॉन्स्टेबल राजेंद्र पावरा, हवालदार महेंद्र पाटील, चालक व हवालदार जयेश पाटील आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.