धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : चोरीच्या आठ दुचाकींसह धुळ्यातील अट्टल चोरटा जाळ्यात


Dhule Local Crime Branch’s Big Achievement : A staunch thief in Dhule with eight stolen bikes in the net धुळे (09 ऑक्टोबर 2024) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान उबेद अली अशरफ अली (20, दुर्गादेवी मंदिराजवळ, विटभट्टी, देवपूर, धुळे) या संशयीताला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख 55 हजार रुपये किंमतीच्या आठ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. शहर व तालुका हद्दीतील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून अन्य सहा दुचाकींबाबत चेसीस क्रमांकाद्वारे खातरजमा केली जात आहे.

दुचाकी चोरीच्या तपासात संशयीत गजाआड
सुनील ताराचंद भील (वरखेडी, ता.जि.धुळे) यांची दुचाकी (एम.एच.18 ए.व्ही.5153) ही कुंडाणे रस्त्यावरील डॅमजवळून 6 सप्टेंबर 2024 रोजी चोरीला गेल्याने धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेला ही चोरी उबेद अलीने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास एकवीरा देवी मंदिर परिसरातून ताब्यात घेवून बोलते केल्यानंतर त्याने चोरीची दुचाकी काढून दिली तसेच अन्य चोरी केलेल्या सात दुचाकी काढून दिल्या. धुळे शहर व तालुका हद्दीतील दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून अन्य सहा दुचाकींबाबत चेसीस क्रमांकाद्वारे खातरजमा केली जात आहे.






यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, सहा.निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, मुकेश वाघ, शशीकांत देवरे, चेतन बोरसे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, धर्मेंद्र मोहिते, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !