जळगावात सीबीआयचा ट्रॅप : पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकारी जाळ्यात


CBI Trap in Jalgaon : Chief Finance and Accounts Officer of PF in the net जळगाव (10 ऑक्टोबर 2024) : जळगावातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकारी रमण वामन पवार (58, शनिपेठ, जळगाव) यास पुणे सीबीआयने 25 हजारांची लाच स्वीकारताच अटक केली. वडिलांच्या नावे असलेल्या फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी संशयीताने 25 हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तडजोडीअंती स्वीकारले 25 हजार
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटींवर बोट दाखवले. फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी 50 हजारांची लाच मागून 25 हजारांवर तडजोड ठरली. माळी यांनी पुण्यात सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.






संशयीत 19 पर्यंत कोठडीत
माळी यांच्या जळगाव आणि नाशिक येथील राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यात त्यांच्या मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. पवार यांना बुधवारी न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पवार हे नाशिक येथील अंबड, लिंकरोड येथे वास्तव्यास आहेत तर जळगाव येथील शनिपेठ भागात ते भाडेतत्त्वावर राहतात. ‘दैनिक दिव्य मराठी’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !