शिरपूर तालुका पोलिसांची दमदार कारवाई : 14.50 लाखांच्या गांज्यासह त्रिकूट जाळ्यात

ड्रोन कॅमेर्‍याद्वारे पडताळणीनंतर कारवाई : दोन संशयीत पसार


Strong action by Shirpur taluka police : Trikut caught with 14.50 lakh ganja शिरपूर (10 ऑक्टोबर 2024) : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अतिदुर्गम भागातील महादेव दोंदवाडा गाव शिवारातील वनजमिनीवरील फुलवलेल्या गांजा शेतीवर बुधवारी कारवाई करीत 14 लाख 40 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला तर पिकअप वाहन, दुचाकीसह एकूण 17 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली तर तिघे पसार झाले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारातील वनजमिनीवर काहींनी गांजा शेती फुलवल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ड्रोन कॅमेर्‍याची मदत घेत पडताळणी केली तसेच अंमलदार, आरसीपी पथकाला सोबत घेत बुधवारी दुपारी साडेचार वाजता कारवाई केली. यावेळी नवसिंग जुम्मा पावरा (30), देविलाल जुम्मा पावरा (25) व सुमनबाई प्रभुदास उर्फ प्रभुजी ठाकोर (पावरा, सर्व रा.महादेव दोंदवाडा) यांना अटक करण्यात आली तर अन्य संशयीत प्रवीण मगन पावरा, सुरेश करमसिंग पावरा व सुनील थावर्‍या पावरा हे पसार होण्यात यशस्वी झाले. 14 लाख 40 हजारांची 720 किलो गांजाची झाडे, अडीच लाख रुपये किंमतीची पिकअप (एम.एच.46 ए.एफ.1246) व 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.18 सी.बी.5457) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार सागर ठाकुर यांच्या फिर्यादीवरून प्रवीण मगन पावरा, चिक्का उर्फ देविता जुम्मा पावरा, नवसिंग जुम्मा पावरा, सुरेश करमसिंग पावरा, सुमनबाई प्रभुदास उर्फ प्रभुजी ठाकोर व सुनील थार्‍या पावरा सर्व (रा.दोंदवाडा, ता.शिरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, किशोर चव्हाण, हवालदार सागर ठाकुर, चत्तरसिंग खसावद, राजु ढिसले, मुकेश पावरा, प्रकाश भील, ग्यानसिंग पावरा, रोहिदास पावरा, धनराज गोपाळ, भुषण पाटील, अल्ताफ मिर्झा, इसरास फारुकी प्रतिभा देशमुख व शिरपूर आरसीपी पथकाने केली.

 


कॉपी करू नका.