स्थानिक युवकांनी कला क्षेत्राकडे वळावे : डॉ.कुंदन फेगडे
यावल शहरात ‘खान्देशी धमाका’ कार्यक्रमात कलावंतांनी उधळले रंग
Local youth should turn to art field : Dr. Kundan Fegde यावल (11 ऑक्टोबर 2024) : आश्रय फाउंडेशन, यावलचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खानदेशी अहिराणी सुपरस्टार्सचा ‘खान्देशी धमाका’ हा कार्यक्रम नुकताच शहरात झाला. यावेळी खानदेशी सुपरस्टार्सला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. कार्यक्रमास खान्देशी सुपरस्टार सचिन कुमावत, आबासाहेब चौधरी, पुष्पा ठाकूर, भैया मोरे, मेघा मुसळे, प्रशांत देसले, धीरज चौधरी, अशोक वानरसे, दीपक देवराज, कावेरी पाटील, विनोद कुमावत आणि विलास वाघ यांनी आपली कला सादर केली. नागरिक, युवक, आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
लोक कलावंतांचा गौरव
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगपती कै.रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व खानदेशी लोककलावंतांचा सत्कार डॉ.कुंदन फेगडे यांनी केला. आयोजनास सहकार्य करणार्या सर्व स्वयंसेवकांचे त्यांनी जाहीर आभार मानले. यावेळी डॉ.फेगडे म्हणाले की, आताच्या युवकांनी स्थानिक कलांकडे जास्तीत-जास्त संख्येने वळायला हवे. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, यावल परिसरातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





