महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिलासा : शिंदे सरकारने योजनेची मुदत वाढवली


Relief for beloved sisters in Maharashtra : The Shinde government has extended the scheme मुंबई (11 ऑक्टोबर 2024) : अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लाडकी बहिण योजनेची पुन्हा शिंदे सरकारने मुदत वाढवून राज्यातील बहिणींना दिलासा दिला आहे. लाभार्थी महिलांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच दाखल होणार अजृ
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अजूनही अर्ज न करू शकलेल्या महिलांसाठी सरकारने आणखी चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12 पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येतील व अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच दाखल करावेत, अशी अट सरकारने ठेवली आहे.


15 ऑक्टोंबर अखेरची तारीख
दरम्यान, सरकारने राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू केल्यापासून अनेकदा अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची 15 ऑक्टोबर ही शेवटची संधी ठरण्याची शक्यता आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !