मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा ; मनोज जरांगे पाटलांनी दिला हा इशारा
बीड (12 ऑक्टोबर 2024) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 14 महिन्यांपासून समाजाचा संघर्ष सुरू आहे. त्यातच समाजाचे नेते
गमनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी बीड जिल्ह्यातील नारायणगड येते झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहितेपर्यंत निर्णय न घेतजल्यास व काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा दिल्यानंतर खळबळ उडाली आहे.
आचारसंहिता लागताच निर्णय जारी करणार
आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन. तेव्हा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात समाजाला केले. या ताकदीनं आपण एकत्र येणार असं वाटलं नव्हतं. दु:खातून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत, त्यामुळे हा समुदाय कधीच जातीयवाद करू शकत नाही. संपूर्ण राज्यभर पसरलाय. पण कधी मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही.
प्रत्येकाला सांभाळण्याचं प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायानं केलंय. यांनी कधी जातीयवाद केला नाही आणि जात यांना कधी शिवली पण नाही. एवढा जनसमुदाय पहिल्यांदाच बघतोय. काय बोलावं ते सूचत नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आलाय की की, तुमच्या चरणावर खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. जातीवाद न करण्याची शिकवण या नारायणगडाने राज्याला देशाला दिलीय. या गडाच्या आशीर्वाद ज्याच्या पाठीवर पडतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारला दिला हा इशारा
जरांगे म्हणाले की, जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी आचारसंहिता लागेपर्यंत करतात का हे पाहायचं मात्र असं झालं नाही तर यांच्या नाकावर टिच्चून यांना उलथं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. तसेच तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणार्या सरकारला संपवल्याशिवाय मागे हटणार नाही”, असं आश्वासनही त्यांनी मराठा समाजाला दिलं.