भुसावळात मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे आमदारांनी केले स्वागत
पहिल्या दिवशी 15 प्रवाशांकडून आरक्षण : निर्णयामुळे प्रवाशांची सोय
Reservation by 15 passengers on the first day : Convenience of passengers due to decision भुसावळ : मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला भुसावळला प्रायोगिक तत्वावर रेल्वे बोर्डाकडून थांबा देण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी 15 प्रवाशांची आरक्षण तिकीटे काढली तर भुसावळात ही गाडी आल्यानंतर आमदार संजय सावकारे व डीआरएम ईती पांडे यांनी एक्सप्रेसचे स्वागत करीत हिरवी झेंडी दाखवून या गाडीला रवाना केले.
प्रायोगिक तत्वावर गाडीला थांबा
रेल्वेने प्रायोगिक तत्वावर भुसावळ स्थानकावर 22221/22222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या गाडीला भुसावळात दोन मिनिटांचा थांबा दिला आहे. या गाडीला शुक्रवारी 11 रोजी भुसावळ स्थानकावर आमदार संजय सावकारे, डीआरएम ईति पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. संबंधित शाखा अधिकारी, प्रवासी संघटनेचे अधिकारी, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती व मंडळ रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.




भुसावळात अतिरीक्त थांबा ः प्रवाशांची सोय
22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्सप्रेसला 10 ऑक्टोबरपासून भुसावळात थांबा मिळाला आहे. ही गाडी रात्री 9.15 आल्यानंतर 9.17 वाजता रवाना होईल. 22222 हजरत निजामुद्दीन दिल्ली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई राजधानी एक्सप्रेस 11 ऑक्टोबरपासून भुसावळात पहाटे 5.15 वाजता आल्यानंतर 5.17 वाजता मुंबईकडे रवाना होईल. प्रवाशांनी या गाडीच्या थांब्याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.