सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हा रांगोळीचा उद्देश

भुसावळातील कार्यशाळेत गीता रावतोले : प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम


भुसावळ (14 ऑक्टोबर 2024) : उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे म्हणजे रांगोळीचा हेतू आहे. रांगोळीला रंगवल्ली संस्कृत भाषेत म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात व भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा रांगोळी असल्याचे प्रतिपादन भुसावळात वास्तू व रांगोळी मार्गदर्शक गीता मोहन रावतोले यांनी केले. शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 14 ते 15 रोजी शहरातील संतोषी माता सभागृहात आयोजित रांगोळी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

महिलांसह तरुणींचा सहभाग
गीता रावतोले यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले की, संस्कार भारती रांगोळ्या भारतभर अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्या नियमितपणे विविध सण आणि समारंभांमध्ये सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, मोठ्या मैदानांवर किंवा हॉलमध्ये रांगोळी कलाकारांच्या मोठ्या गटांच्या टीमवर्कद्वारे तयार केल्या जातात.


संस्कार भारती रांगोळीचे महत्व व चिन्हांचे महत्व त्यांनी सांगून रांगोळीचा इतिहास सांगितला. प्रमुख अतिथी व महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्याहस्ते गणेश पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत शहर व तालुक्यातील सुमारे शंभरावर महिलांसह तरुणींचा सहभाग आहे.

आज रांगोळी कार्यशाळेचा समारोप
दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप मंगळवार, 15 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सूत्रसंचालन वैशाली सैतवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी अनिता आंबेकर, मनीषा काकडे, वैशाली महाजन, जयश्री चौधरी, वर्षा लोखंडे, राजश्री बादशाह, वैशाली भगत, सुनंदा भारूले आदींसह प्रतिष्ठा महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !