चतुरस्त्र अभिनेता अतुल परचुरे यांचे निधन


Chaturastra actor Atul Parchure passed away मुंबई (14 ऑक्टोबर 2024) :  हिंदीसह मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते व मराठी रंगभूमीवरील कलावंत अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या कॅन्सरने निधन झाले. अतुल यांना कर्करोगाने घेरले होते मात्र या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते मात्र सोमवारी अतुल यांच्यावर क्रुर काळाने झडप घातली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स पोस्ट करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी म्हणाले, चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट, रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो.






लाखो प्रेक्षकांची जिंकली मने
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेले पाहायला मिळाले होते. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र मधल्या काही काळात अतुल यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास ठेवला होता.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !