शेंदूर्णी दूरक्षेत्रांतर्गत नूतन पोलीस चौकीचा शुभारंभ

पहूर (15 ऑक्टोबर 2024) : पहूर पोलीस ठाण्यांतर्गत शेंदुर्णी दुरुक्षेत्र येथे जिल्हा नियोजन समितीमार्फत नूतन पोलीस चौकीचे अनावरण व शुभारंभ जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला.
यावेळी पाचोरा पोलीस उपअधीधक धनंजय येरुळे, पहूरचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, भाजपा तालुकाध्यक्ष बाविस्कर, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जे.के.चव्हाण, संजय गरुड, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, पंडित जोहरे, जावा सेठ, खलील शेख, फारुक शेख इतर राजकीय पदाधिकारी, पत्रकार, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
