निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद : महाराष्ट्रासह झारखंड निवडणुकीची होणार घोषणा !
Election Commission’s press conference today : Maharashtra and Jharkhand elections will be announced! मुंबई (15 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांनचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले असून त्यानंतर महाराष्ट्रासह झारखंडमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. झारखंडमध्ये एका पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये शक्यतो एकाच टप्प्यात निवडणुका होतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त निवडणुकीची घोषणा करण्यात येईल.





