जळगाव जिल्ह्यातील 84 महसूल मंडळातील केळी उत्पादकांना 327 कोटींची भरपाई मंजूर !

मंत्री रक्षा खडसेंच्या प्रयत्नांना यश : लवकरच बँंक खात्यात जमा होणार रक्कम


Compensation of 327 crores approved to banana producers in 84 revenue circles of Jalgaon district! मुक्ताईनगर (15 ऑक्टोबर 2024) : ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील 84 महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान 45 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला फटका बसल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांनी फळ पीक विमा योजनेंतर्गत भरपाईची मागणी केल्यानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी संबंधित कंपनी व शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील 84 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना 327 कोटींची भरपाई मिळणार असल्याची माहिती मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

लवकरच बँक खात्यात भरपाई जमा होणार
यापूर्वी जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस कमी तापमानामुळे विमा धारक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. कमी-जास्त तापमानामुळे झालेल्या एकूण नुकसान भरपाईची 327 कोटी 55 लाख 15 हजार 184 रुपयांची एकत्रीत रक्कम लवकरच जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.


  • या महसूल मंडळातील केळी उत्पादकांना भरपाई मिळणार
  • भुसावळ- कुर्‍हेपानाचे, नशिराबाद, पिंपळगाव खुर्द, वरणगाव
  • बोदवड- बोदवड, करंजी, नाडगाव
  • चोपडा- अडावद, चहार्डी, चोपडा, धानोरा प्र.अडावद, गोरगावले बु.॥, हातेड बु.॥, लासूर
  • जामनेर- जामनेर, मालदाभाडी, नेरी बु.॥, पहूर, फत्तेपूर, शेंदुर्णी, तोंडापूर, वाकळी
  • मुक्ताईनगर- अंतुर्ली, घोडसगाव, कुर्‍हे, मुक्ताईनगर
  • रावेर- ऐनपूर, खानापूर, खिर्डी बु.॥, खिरोदे प्र.यावल, निंभोरा बु.॥, रावेर, सावदा
  • यावल- भालोद, बामणोद, फैजपूर, किनगाव बु.॥, साकळी, यावल
  • अमळनेर- अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, पातोंडा, शिरुड, वावडे
  • भडगाव- आमडदे, भडगाव, कजगाव, कोळगाव
  • चाळीसगाव- बहाळ, चाळीसगाव, हातळे, खडकी बु.॥ मेहुणबारे, शिरसगाव, तळेगाव
  • धरणगाव- चांदसर बु.॥, धरणगाव, पाळधी बु.॥, पिंप्री खुर्द, साळवे, सोनवद बु.॥
  • एरंडोल- एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गुजर ह
  • जळगाव- असोदा, भोकर, जळगाव, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा.
  • पाचोरा- गाळण बु., कुर्‍हाड खु., नगरदेवळे बु., नांद्रा, पाचोरा, पिंपळगांव बु., वरखेडी बु.
  • पारोळा- बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळवे बु., तामसवाडी






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !