चार हजारांची लाच भोवली : धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्यातील हवालदार नाशिक एसीबीच्या जाळ्यात
Bribe of Rs 4,000 : Constable of Devpur police station in Dhule in the net of Nashik ACB धुळे (15 ऑक्टोबर 2024) : ओमनी गाडीवर सोडा विक्री करू देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी चार हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याचे हवालदार एजाज काझी (52, पोलीस मुख्यालय, धुळे) यांना नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच पोलीस ठाण्यातच अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
50 वर्षीय तक्रारदार हे देवपूर पोलीस ठाणे हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करतात व हा व्यवसाय करून देण्यासाठी व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हवालदार एजाज काझी यांनी चार हजारांची लाच मंगळवारी मागितली व तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. देवपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराकडून चार हजारांची लाच स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





