स्थानिक ठेकेदारांवर अन्याय : दीपनगरात काम बंद आंदोलन
दीपनगर (15 ऑक्टोबर 2024) : 660 मेगावॅट प्रकल्पात स्थानिक ठेकेदारांना वंचित ठेवून छोटी कामे एकत्रीत करीत मोठी निविदा परप्रांतीय ठेकेदारांसाठी बनविण्यात आली असून परप्रांतीय प्रकल्पात कामे घेतील तर परप्रांतीय मजूर आणतील त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार नाही आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ येईल या निषेधार्थ वंचित बहुजन कंत्राटदार संघटना व स्थानिक कंत्राटदार संघटनेकडून मंगळवरी स्थानिक ठेकेदारांसह मजुरांनी कामबंद आंदोलन केले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलानाचे नेतृत्व वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदार व स्थानिक कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष उल्हास बोरोले यांनी केले, आंदोलनात स्थानिक कंत्राटदार महेश पिठले, रामचंद्र तायडे, प्रवीण पाटील, राहुल निंबाळकर, प्रकाश तायडे, बालाजी पठाडे, बबुसिंग सनासे, निशांत निकम, विजयकुमार भालेराव, सलमान पठाण, बंटी सरदार, तुळशीराम तायडे, उस्मान पठाण, निलेश कांबळे, संकेत पाटील, गजानन सूर्यवंशी, इत्यादी स्थानिक कंत्राटदारांसह इतर स्थानिक बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.





