भुसावळातील रेल्वेतील तिकीट निरीक्षकांची सतर्कता : हरवलेली पर्स महिलेला मिळाली


भुसावळ (15 ऑक्टोबर 2024) : अप राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या एका महिला प्रवाशाची भुसावळात उतरताना सीटवर पर्स राहिली. या पर्समध्ये दागिणे तसेच रोकड व अन्य महत्त्वाचे कागदपत्र होते. महिला प्रवाशाने सोमवारी पहाटे साडेपाच वाजता वाणिज्य उपस्टेशन प्रबंधक मिलिंद साळुंके यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तातडीने त्यांनी तिकीट निरीक्षक एन.बी.राठोड आणि अंश शर्मा यांच्याशी संपर्क साधला व उभयतांनी महिलेने सांगितलेल्या बर्थ क्रमांकावर पर्स ताब्यात घेत पठाणकोट एक्स्प्रेसने भुसावळात येत महिलेच्या ताब्यात पर्स दिली.

पैसे, सोन्याचे दागिने आणि आवश्यक कागदपत्रे सुरक्षित स्थितीत मिमळाल्यानंतर महिलेने रेल्वे कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या मदतीचे कौतूक करीत रेल्वे प्रशासनाला धन्यवाद दिले.


कॉपी करू नका.