वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणार कठोर कारवाई : सहा.निरीक्षक उमेश महाले

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात परिवहन समितीची सभा


भुसावळ (15 ऑक्टोबर 2024) : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिवहन समितीची सभा झाली. भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक उमेश महाले, कर्मचारी कलीम शेख उपस्थित होते. महाले व सलीम शेख यांचा सत्कार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी केला. आभार प्रदर्शन एस.डी.वासकर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनचालक उपस्थित होते.

नियम न पाळल्यास होणार कारवर्इा
सहा.निरीक्षक महाले म्हणाले की, विद्यार्थी वाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनात आग विझवणारी यंत्रणा असावी, नशा आणणार्‍या पदार्थांचे सेवन चालकांनी करू नये व अशी बाब निदर्शनास आल्यावर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच वाहकाजवळ प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव व मोबाईल नंबर असणे गरजेचे असून वाहतूक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एल.राणे यांची उपस्थिती होती. शिक्षक एस.पी.पाठक, एम.एस.बोंडे, बी.बी.जोगी, एस.एस.कापसे, एन.पी. नेहेते, एन.ए.नेमाडे यांचे सहकार्य लाभले.


कॉपी करू नका.