अट्रावलला दुर्गोत्सव मिरवणुकीत चाकू बाळगला : एकाविरोधात गुन्हा


Atravala carrying knife in Durgotsava procession : Crime against one यावल (16 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील अट्रावल येथे ग्रामपंचायत चौकात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये 29 वर्षीय तरुण आपल्याजवळ दहशत पसरवण्याच्या उद्देशातून धारदार चाकू बाळगून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मिळताच त्यास अटक करण्यात आली व त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अट्रावल येथे सोमवारी दुर्गा उत्सव विसर्जन मिरवणूक सुरू असताना ग्रामपंचायत चौकात मिरवणूक आल्यानंतर तेथे धनराज उर्फ दीपक हरिचंद्र चव्हाण (29) हा संशयीत दहशतीसाठी चाकू बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व पथकाने संशयीताला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात पोलीस नाईक किशोर परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


कॉपी करू नका.