महाविकास आघाडीचे 215 जागांवर एकमत : 73 जागांवर तीन दिवसात अंतीम निर्णय


Consensus of Mahavikas Aghadi on 215 seats : Final decision on 73 seats in three days मुंबई (16 ऑक्टोबर 2024) : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीत उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीत 215 जागांवर एकमत झाल्याची माहिती असून अन्य 73 जागांचा निर्णय तीन दिवसात होणार आहे. समजलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला 84, तर शरद पवार गट आणि उद्धवसेनेला प्रत्येकी 65 जागा तर एक जागा सपाच्या अबू आझमी यांची अंतिम करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज वा दोन दिवसात महाविकास आघाडीकडून जागांची पहिली यादी जारी होवू शकते.

काँग्रेसची पहिली यादी जारी होणार
आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होत आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत 30 लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. दिल्लीत होणार्‍या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी.वेणुगोपाल, मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत रमेश चेन्नीथला, महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित राहतील

काँग्रेसला मिळणार सर्वाधिक जागा
215 जागांवर सर्वांची संमती मिळाली तर अन्य 73 जागांवर मित्र पक्षांसह आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्याही जागा असतील. सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे चित्र आहे. विदर्भात काँग्रेससाठी, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी, तर मराठवाड्यात ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेससाठी जास्त जागा देण्यात आल्या. मुंबई आणि कोकणात उद्धवसेनेला इतर दोन पक्षांच्या तुलनेत जास्त जागा देण्यात येतील. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ वेब पोर्टलने दिले आहे.


कॉपी करू नका.