आरएसएस संघचालक मोहन भागवत भुसावळहून धुळ्याकडे रवाना


RSS Sanghchalak Mohan Bhagwat left for Dhula from Bhusawal भुसावळ (16 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मंगळवारी सायंकाळी साडेआठ वाजता हटीया एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर ते सुरक्षा रक्षकांच्या प्रचंड गराड्यात धुळ्याकडे रवाना झाले.

आज धुळ्यातील कार्यक्रमास हजेरी
सूत्रांच्या माहितीनुसार, धुळे शहरात बुधवार, 17 रोजी होणार्‍या कार्यक्रमास ते हजेरी लावणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत हे हटीया एक्स्प्रेसने येणार असल्याची माहिती कळताच पोलीस यंत्रणेने केला सायडींग भागात मोठा बंदोबस्त वाढवला होता. मंगळवारी रात्री 8.30 वाजता हटीया एक्स्प्रेस आल्यानंतर भागवत हे केला सायडींग भागातून सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून चारचाकी वाहनांद्वारे धुळ्याकडे रवाना झाले. यावेळी स्थानिक पोलिसांसह झेड प्लस सुरक्षा, कमांडो यांचा बंदोबस्त पुरवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणेत त्यांच्या गाड्यांच्या कॅन्व्हायमध्ये नेटवर्कीग जामरची गाडी, रुग्णवाहिकेाही समावेश होता. मोहन भागवत यांच्या धुळे दौर्‍याबाबत मात्र प्रचंड गोपनीय पाळण्यात आली.


कॉपी करू नका.