हॉटेलमध्ये नेत कोचकडून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार
छत्रपती संभाजीनगर (16 ऑक्टोबर 2024) : खो खो स्पर्धेचे धडे देणार्या कोचने अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली. शिवाजी जगन्नाथ गोरडे या आरोपीविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
आरोपी खासगी कोच शिवाजी गोरडे खो-खोच्या स्पर्धेचे धडे देत असताना एका शाळेतील विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. आरोपीने एका हॉटेलात नेत तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने याबाबत पंधरा दिवस वाच्यता केली नाही. परंतु तिच्या मैत्रिणीमार्फत आरोपी सतत पाठलाग करत रहिला. त्यावेळी तिने ही बाब पालकांच्या निर्दशनास आणून दिली. त्यातंर पालकांच्या सोबत पीडिता पोलिसापर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कोच विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.