नागपूर-पुणे एक्स्प्रेसला मूर्तिजापूर तर बडनेरा-नाशिक विशेष मेमूला बोरगावला थांबा


भुसावळ (16 ऑक्टोबर 2024) : रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर-पुणे एक्स्प्रेसला मूर्तिजापूर आणि बडनेरा-नाशिक विशेष मेमूला बोरगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. 15 रोजी गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक मेमू विशेष गाडीला बोरगांव स्थानकावर खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वे अधिकारी , नागरिक, प्रवासी संघटनेचे अधिकारी, स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.

मेमूला बोरगावी थांबा
गाडी क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा मेमू विशेष गाडी 16 ऑक्टोबर 2024 पासून दररोज 3.2 वाजता येेईल व 3.3 वाजता रवाना होईल तर गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक मेमू 15 पासून आगमन 11.42 वाजता येईल 11.43 वाजता रवाना होईल. गाडी क्रमांक 12135 पुणे- नागपूर एक्सप्रेस 16 ऑक्टोबर 2024 पासून मूर्तिजापूर येथे आगमन पाच वाजता येईल व 5.2 वाजता रवाना होईल तर गाडी क्रमांक 12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस 16 ऑक्टोबर 2024 पासून मूर्तिजापूर येथे आगमन 9.23 वाजता होईल व 9.25 वाजता रवाना होईल. प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.