भुसावळात फुटबॉल कोचचा शॉक लागल्याने मृत्यू


भुसावळ (17 ऑक्टोबर 2024) : शहरातील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीमधील रहिवासी सिध्दार्थ अनिल पवार (35) हा फुटबॉल कोच खेळाडूंना मैदानावर प्रशिक्षण देत असताना लाईट आल्यानंतर बटन सुरू करीत असतांनाच त्याचा विजेचा जबर धक्का बसला व त्याचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घडली.

शहर पोलिसात नोंद
भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीतील रहिवासी सिध्दार्थ पवार हा फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी मैदानावर गेला होता. यावेळी संध्याकाळी 5.45 वाजेच्या सुमारास लाईट आल्याने सिध्दार्थ याने तेथील लाईटाचे बटन सुरू केले. यावेळी त्याला जबर शॉक बसल्याने त्यासत शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. यामुळे या भागात शोककळा पसरली. याप्रकरणी येथील शहर पोलिसात मृत सिध्दार्थ याचे काका दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, अब्दुल रज्जाक अब्दुल गनी, विकार शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद पुढील तपास करीत आहे.

सिध्दार्थ फुटबॉल कोच असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच असंख्य खेळाडू हॉस्पीटलमध्ये जमा झाले होते. याप्रकरणी आरपीएफने सुध्दा याची नोंद केली.


कॉपी करू नका.