रावेरला अचानक आग लागून मोटारसायकल जळाली


रावेर (17 ऑक्टोबर 2024) : शहरातील स्टेट बँकेच्या सुरक्षा रक्षकाची मोटारसायकल जळून खाक झाली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. स्टेट बँकेतील सुरक्षा रक्षक तथा माजी सैनिक राजेंद्र रामदास चौधरी यांनी स्टेट बँकेच्या आवारात दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19- 5275) उभी केली असता तिला अचानक आग लागली.

आग लागताच सुरक्षा रक्षक तथा माजी सैनिक राजेंद्र चौधरी व विवेक भदे यांनी आग लागलेल्या मोटारसायकल जवळील इतर मोटर सायकली इतरत्र हलविल्याने मोठा अनर्थ टळला. रावेरच्या अग्निशमन दलाने आग विझवली मात्र तोपर्यंत मोटारसायकल खाक होवून मोठे नुकसान झाले.


कॉपी करू नका.