आसोद्यात संशयीत रितीक कोल्हे नागपूरात स्थानबद्ध


Ritik Kolhe suspected in Asoda stationed in Nagpur जळगाव (17 ऑक्टोबर 2024) : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे (37, रा.असोदा, ता.जळगाव) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता व त्याच्यावर एमपीडीअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर पडताच नशिराबाद पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.

कारागृहातून सुटताच केले स्थानबद्ध
जळगाव तालुक्यातील असोदा येथील योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. परंतु तालुका पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात योगेश हा जिल्हा कारागृहात होता.

नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे याचा जामीन मंजूर झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सहायक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, गिरीश शिंदे, सागर बिडे यांनी योगेश यास 15 ऑक्टोबर कारागृहातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.

 


कॉपी करू नका.