चारचाकी वाहनातून सव्वा लाखांची अवैध दारू तस्करी रोखली : धुळ्यातील संशयीत जाळ्यात

पहूर पोलिसांची कामगिरी : नाकाबंदीदरम्यान कार जप्त


Smuggling of a quarter of a lakh through a four-wheeler vehicle was stopped : in a suspicious net in Dhule पहूर (17 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. सर्वदूर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून पहूर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत धुळ्यातील संशयीताकडून विना परवानागी वाहतूक होणारी तब्बल सव्वा लाख रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली तर कारसह एकूण सात लाख 75 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक दिलीप अशोक पाटील (धुळे) यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
पहूर हद्दीत पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी पहूर-जळगाव रोडवर चारचाकी (एम.एच.20 ईई 3097) मध्ये एक लाख 25 हजार 430 रुपये किंमतीची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस अंमलदार गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील, हेमंत सोनवणे आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.